कणकवली (प्रतिनिधी) - तळेरे बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरातील दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी, वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अखेर पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांनी तळेरे परिसराची पाहणी करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. श्री गणेश चतुर्थी उत्सव तसेच एप्रिल-मे महिन्यात वाढणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता तळेरे येथे कायमस्वरूपी दोन ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन निरीक्षक नलवडे यांनी दिले.
याचबरोबर तळेरे बसस्थानक परिसरातील वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन आजपासूनच एका पोलीस हवालदाराची तात्काळ नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष राजू जठार आणि सेक्रेटरी आप्पा कल्याणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेतील असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यासाठी हालचाली करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणे ही नागरिकांसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.
तळेरेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे प्रशासनाने घेतलेली ही दखल सकारात्मक पाऊल मानले जात आहे. वाहतूक, सुरक्षा आणि बाजारपेठेतील इतर समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लवकरच तळेरे येथे सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये ठोस निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणीवेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार, रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर, व्यापारी संघटना कार्याध्यक्ष अमोल सोरप, सेक्रेटरी आप्पा कल्याणकर, सचिन पावसकर, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव तसेच व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.