संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - मे महिना सुट्यांचा दिवस सारेच इकडून तिकडून प्रवास करणारे प्रवासी असतात त्यात इंधन पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इंधन बचतीचा नारा केन्द्र सरकारसह राज्य सरकारने देखील दिला असून त्याचे पालन करा असे आवाहन तथा नारा राज्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री यांनी दिला. मात्र त्यात सर्व सामान्य जनतेची मोठी कसरत पणाला लागली असून चक्क मार्गावरून नित्यनेम सेवा देणारी लालपरी एसटी बसचा तुटवडा निर्माण झाल्याने तिची सेवाच कोलमंडली असल्याचे समजते. त्यामुळे सर्व सामान्य प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला तासंतास डोळे लावून तिची प्रतिक्षा प्रवासी स्थानकावर करावी लागत असल्याने कोलाड नाक्यावर तासंतास प्रवासी ताटकळत उभेच. त्यामुळे परिवहन खात्याचा भोंगळ कारभाला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सर्वत्र व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे त्यात कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाचे देखिल काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण होत आहे. शालेय सुट्टी लागल्याने परगावी राहत असलेले नागरिक गावाकडे ये जा करत असतात. त्यात कोकणचा केंद्र बिंदू म्हणून या मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्याची ओळख आहे. असंख्य प्रवासी येथून विविध ठिकाणी प्रवास करत असतात. मात्र याच ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला तासंतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. रत्नागिरी, चिपळूण, श्रीवर्धन, माणगावकडून येणाऱ्या एसटी बस ह्या फुल भरून येत असल्याने त्या उभ्या देखील राहत नाहीत. जर राहिल्या तर दूरवर त्यात इतर वाहने येत असल्याने या प्रवाश्यांना धावाधाव करावी लागते तोवर ती बस निघून जाते. त्यामुळे प्रवासी वर्गात एकच संताप उडत आहे. इतर खाजगी वाहनांचा प्रवासी दर वाढल्याने ते सर्व सामान्य नागरिक तथा लाडक्या बहिणींना न परवडणारे झाले आहे. तसेच या ठिकाणी परिवहन खात्याचे कोणीही वाहक कंट्रोल अधिकारी नसल्यामुले येथील प्रवासी वर्गाला वेळेवर सेवा मिळत नसल्याचे बोलले जात आहे. त्यात बसचा तुटवडा झाला आहे का असाच सवाल आता प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.
सकाळपासून सायंकाळ रात्री उशिरा पर्यंत प्रवासी येथून प्रवास करत असतात. तसेच त्यात उन्हाचा उष्म्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यात त्यांचा प्रवास वेळेवर होत नसल्याने अधिक ताण सर्व सामान्य नागरिक तसेच कामगार, चाकरमानी यांच्या मनावर होत आहे. कोलाड नाक्यावर तासंतास ताटकळत उभे बस आली रे आली की एकच झुंबड.. मुंबईकडे जाणाऱ्या साऱ्या बस फुल भरून जात असल्याने या ठिकाणी बस सेवेची प्रवासी वर्गाला मोठी कमतरता भासत आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, आणि सोमवारी तर अक्षरशः मोठी प्रवाशांची गर्दी होत असल्याने ऐन वेळी एसटीची बसची पुरेशी सेवा मिळत नसल्याने येथील प्रवासी वर्गातून एकच संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे.






















































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.