पनवेल (प्रतिनिधी) - भाजपा पनवेल शहर मंडलाच्यावतीने पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परेशदादा चषक २०२६ या भव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानात रविवारी १७ मे २०२६ रोजी या स्पर्धेचा थरार रंगला. सेवा क्षेत्रातील विविध व्यक्ती, अधिकारी वर्ग आणि तज्ज्ञ यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यांना क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपाचे पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजाराव यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चषक स्पर्धेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या संघांनी मैदानात उतरून आपला उत्कृष्ट खेळ दाखवला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यांमध्ये वकिलांच्या संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आणि मानाचा चषक पटकावला. तर डॉक्टरांच्या संघाने उत्कृष्ट लढा देत द्वितीय क्रमांक मिळवला.
या सामन्यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, दशरथ म्हात्रे, अजय बहिरा, गणेश कडू, नगरसेविका प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, शिवानी घरत, अस्मिता घरत, माजी नगरसेवक सुनिल बहिरा, उमेश इनामदार, प्रशांत शेट्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.






















































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.