loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली आगारात भाजपची धडक; प्रवाशांसाठी अखेर एसी इलेक्ट्रिक बस उपलब्ध

दापोली (वार्ताहर) : दापोली आगाराच्या कारभाराविरोधात सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी आगारात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. दापोली-पुणे मार्गावरील वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे आरक्षण करूनही प्रवाशांना साधी बस देण्याचा प्रकार पुन्हा घडल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. दापोली आगारातून पुण्यासाठी नियमित एसी बस सेवा सुरू असून, प्रवासी आगाऊ आरक्षण करतात. मात्र अनेक वेळा गाडी चार्ज नाही असे कारण देत साधी बस उपलब्ध करून दिली जाते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी सकाळी पुणे मार्गांवर जाण्यासाठी एसी बसऐवजी साधी बस, बस स्थानकात फलाटावर लावण्यात आल्याची माहिती मिळताच भाजप पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकात धाव घेतली. यावेळी आगार प्रमुखांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अखेर प्रवाशांसाठी वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम इदाते, तालुकाध्यक्ष सचिन होडबे व जया साळवी, प्रसाद मांडवकर, अजय कदम, विकास लिंगावळे, सुरेश मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg