loader
Breaking News
Breaking News
Foto

मोती तलाव परिसरातील पादचारी मार्गावरील अडथळा दूर; नागरिकांना दिलासा

सावंतवाडी: मोती तलाव परिसरातील पादचारी मार्गावर असलेला आणि नागरिकांच्या चालण्यात अडथळा ठरत असलेला विद्युत पोल हटवण्यासाठी नागरिकांनी लक्ष वेधले असता नगरपरिषद सभापती प्रतीक बांदेकर यांनी तातडीने दखल घेत हा अडथळा दूर केला. यामुळे स्थानिक नागरिक आणि मॉर्निंग, इव्हीनींग वॉक करणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मोती तलाव येथील पादचारी मार्गावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत असतात. मात्र, या मार्गाच्या मधोमध एक जुना पोल उभा होता. त्यामुळे चालताना नागरिकांना कसरत करावी लागत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा पोल येथून हटवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली असता सभापती प्रतीक बांदेकर यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर हा अडथळा ठरणारा पोल तिथून हटवण्यात आला. तत्परतेने ही समस्या सोडवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सभापती बांदेकर यांचे आभार मानले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg