वेळणेश्वर - विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. सतिश घोरपडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रा. घोरपडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
सत्कारानंतर प्रा. घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या पीएच.डी.च्या प्रवासातील विविध टप्पे, आलेल्या अडचणी व त्यावर मात करत केलेले संशोधन यांचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाने उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभागातील प्राध्यापिका गौरी जोशी तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक योगेश काटदरे व प्रा. प्रिती साठे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून प्रा. घोरपडे यांच्या यशाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी मनोगत व्यक्त करत प्रा. घोरपडे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






















































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.