loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगांव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सदुसष्ठावा मासिक कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी,दि.१८ मे (प्रतिनिधी) आजगांव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सदुसष्ठावा मासिक कार्यक्रम नुकताच आजगाव येथे संपन्न होऊन त्यात जून २०२६ ते मे २०२७ पर्यंतच्या मासिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. साहित्यिक विनय सौदागर यांनी ऑक्टोबर,२०१८ मध्ये स्थापन केलेल्या साहित्य प्रेरणा कट्ट्याचे आजगाव-शिरोडा पंचक्रोशीत सातत्याने मासिक साहित्यिक कार्यक्रम होत आहेत. नुकतेच वर्षभराच्या मासिक कार्यक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाच्या मासिक कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा साहित्य सोहळा, मालवणी बोलीभाषा साहित्य सोहळा, कै. कुमुद रेगे वाचन साधना उपक्रमाची सांगता, एका साहित्यिकाची मुलाखत, कोजागरी कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेतच; त्याशिवाय निसर्ग विषयक साहित्याचा 'निसर्गाच्या शब्दसान्निध्यात', कोवळे शब्द माझे हा शालेय मुलांचा साहित्य विषयक कार्यक्रम ,धर्मसंचित हा धार्मिक ग्रंथांचा परिचयात्मक कार्यक्रम, युवानाट्य हा तरुण कलाकारांचा नाट्याभिनयाचा कार्यक्रम, सावरकरांची लेखणी हा साहित्यिक वि.दा.सावरकरांच्या साहित्याचा वेध घेणारा कार्यक्रम आणि सरस्वतीच्या पद्यपूजक हा थोर कवयित्रींच्या कवितांवर आधारित कार्यक्रम असे विविध रंगी कार्यक्रम होणार आहेत.

टाइम्स स्पेशल

ही वार्षिक नियोजन बैठक विनय सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून बैठकीस सरोज रेडकर, एकनाथ शेटकर, विनायक उमर्ये, दिलीप पांढरे, सिंधु दीक्षित, विनय फाटक, शेखर पणशीकर, कमलेश अणावकर, श्रद्धा राऊळ आणि अनिता सौदागर आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विनोदी साहित्याचे सादरीकरण करण्यात आले. यात सिंधु दीक्षित यानी द.मा.मिरासदारांची गाणारा मुलूख व सरोज रेडकर यानी चंद्रकांत महामिनांची असा मी नंदीबैल या कथा; तर विनय फाटक यांनी पु.लं देशपांडे याचा मी व माझे पत्रकार या लेखाचे वाचन केले. शेखर पणशीकर यानी चि.वि. जोशींचा एक किस्सा सांगितला तर विनय सौदागर यानी सादर केलेल्या दमांच्या रिस्क कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg