loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई विद्यापीठ सलग्न नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - नवनिर्माण महाविद्यालय, संगमेश्वर येथील विज्ञान शाखेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेषतः बॉटनी आणि केमिस्ट्री या दोन विषयांचा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या संजना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाने सातत्याने उत्कृष्ट निकाल देत शैक्षणिक गुणवत्ता कायम राखली असून भविष्यातही ही परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg