loader
Breaking News
Breaking News
Foto

भूलतज्ज्ञ विभागप्रमुखांचा मृत्यू , बीड येथील घटना

बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (स्वराती) भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज (दि.19) सकाळी काळवीट साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. आज सकाळी 6:30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या वृत्तप्रसारामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, डॉ. तरकसे यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना पोहणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आला. त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता, हा मृतदेह डॉ. तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg