खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू अमल सलिम सिद्दीकी हिने अल्पवयात मोठी कामगिरी करत रत्नागिरी जिल्हा १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावर आपले नाव कोरले आहे. तिच्या निवडीमुळे खेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची लाट पसरली आहे. खेड क्रिकेट अकॅडमीमध्ये नियमित सराव करणारी अमल मेहनती, शिस्तप्रिय आणि जिद्दी खेळाडू म्हणून ओळखली जाते. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
अमल सध्या एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असून शिक्षणासोबतच क्रिकेटमध्येही उल्लेखनीय यश मिळवत आहे. तिच्या या यशामागे वडील सलीम इसहाक सिद्दीकी यांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी खेळाकडे वळावे आणि मोठी स्वप्ने पाहावीत, यासाठी अमलचे यश प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा संघ आगामी स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. अमल सिद्दीकी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.






















































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.