देवगड (दयानंद मांगले ) मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली असून पेट्रोल डिझेलचा पुरवठा देखील सुरळीत होत नाही. नागरिकांना भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. या विरोधात आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन निदर्शने करण्यात आले. देवगड एस टी स्टॅन्ड समोर निदर्शने करण्यात आली . या आंदोलनाला शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता. मोदी आणि फडणवीस सरकार विरोधी घोषणा देऊन शिवसैनिकांनी देवगड शहर दणाणून सोडले.
यावेळी कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन ! पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो! रद्द करा, रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा!, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत! अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.
याप्रसंगी सुशांत नाईक म्हणाले, पेट्रोल डिझेलचे दर आज तीन रुपयांची वाढले आहे येत्या काही दिवसांत ते दर २० ते ३० रुपयांनी वाढणार आहेत. मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय धोरण चुकविल्यामुळे सर्व सामन्यांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. रशिया देश भारताला कच्चे तेल देण्यास तयार आहे परंतु त्याला अमेरिकेचा विरोध असल्याने मोदी सरकार रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू शकत नाही.आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इतर पर्याय असूनही मोदी आणि फडणवीस सरकार जाणीवपूर्वक इंधनाची टंचाई निर्माण करीत आहे. रुपयाचे मूल्य देखील घटले असून लवकरच १०० पार होणार आहे. त्यामुळे आता सर्वच गोष्टी महाग होणार आहेत. सर्वसामान्यांना याचा विनाकारण फटका बसत आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगतात परंतु सिंधुदुर्गात वस्तुस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे यापुढे दरवाढ होता नये आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्ही हे आंदोलन केले असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.






















































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.