loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई येथील श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील श्री वरदान देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन नुकताच अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. यावेळी सत्यनारायण महापूजेसह मंदिर परिसरात महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक 'सतीशिळा स्मारका'चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता महाअभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या सतीशिळा स्मारकाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यासाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य विशाखा कुवळेकर, प्रशासक दत्ताराम ओकटे, ग्रामविकास अधिकारी राहुल कुमार चौधरी, पंचायत समिती सदस्या अपर्णा जाधव, माजी आमदार सुभाष बने, माजी सभापती सहदेव बेटकर, कृष्णा हरेकर, माजी सरपंच वसंत उजगावकर, वरदान देवी ट्रस्टचे पदाधिकारी आणि मानकरी व गावकरी मंडळी तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

उद्घाटनानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. रात्री ८ ते ९ या वेळेत श्री विश्वकर्मा भजन मंडळ, सुतारवाडी (कडवई) यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. या धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg