loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्लेच्या निनाद जोशी यांची एसआरपीएफमध्ये निवड; दौंड येथे शपथविधी संपन्न

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील आंजर्ले गावचा सुपुत्र निनाद सुभाष जोशी यांची State Reserve Police Force (एसआरपीएफ) मध्ये यशस्वी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आंजर्ले गावासह संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निनाद जोशी यांचा शपथविधी समारंभ आज दौंड येथील नांदविज प्रशिक्षण केंद्रात उत्साहात पार पडला. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. निनाद यांच्या या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच आंजर्ले ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भविष्यातही त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावत गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्वांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg