loader
Breaking News
Breaking News
Foto

युद्धनौका गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ व पाणबुडी प्रकल्पाने सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार ही निवती लाईट हाऊसजवळच्या समुद्रात बुडवून भारतातील पहिला अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ व पाणबुडी प्रकल्प साकारण्यात येत आहे. युद्धनौका समुद्रतळाशी नेण्याची प्रक्रिया सुरु असून समुद्रातळाशी युद्धनौका विसावल्यावर त्यावर कृत्रिम प्रवाळ व फिशिंग नेट तयार होऊन एक समुद्री जैवविविधता निर्माण होईल. येत्या दीड वर्षात पाणबुडीची निर्मिती केल्यानंतर त्याद्वारे पर्यटकांना समुद्रतळाशी नेऊन पाणबुडी व तेथील समुद्री जैवविविधतेचे दर्शन करता येणार आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि पर्यायाने महाराष्ट्र शासनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आणि अभिमानाचा ठरणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी आणि मोठी दिशा मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण तारकर्ली येथील इसदा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माझगाव शिपयार्डचे निपेंद्र निरव, पाणबुडी तज्ज्ञ सुनील कोरटी, एमटीडीसीचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, एमटीडीसीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे, एमटीडीसी जलपर्यटन वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, बांधकाम व्यवस्थापक दीपक हरणे, प्रादेशिक अधिकारी, बंदर विभागाचे कॅप्टन संजय उगलमुगले आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg