loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात संतप्त नागरीकांनी ठेकेदार कंपनीला तहसील कार्यालयात धरले धारेवर

लांजा (वार्ताहर): मुसळधार पावसामुळे आणि महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार धोरणामुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीनंतर महामार्ग ठेकेदार कंपनीकडून नुकसान भरपाईबाबत दिलेल्या आश्वासनावर घुमजाव सुरू झाल्याने नागरिकांनी थेट आक्रमक भूमिका घेत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला तहसीलदार कार्यालयातच धारेवर धरले. तसेच येत्या दोन दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास गुरुवारी महामार्गाचे काम बंद पाडणार असल्याचा इशाराही दिला. शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्या पासून शनिवारी १ नोव्हेंबर पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे लांजा शहरातील महामार्गावर असलेल्या श्रीराम पुलाजवळील वहाळातील पाणी तुंबले होते. हे तुंबलेले पाणी शनिवारी पहाटे ५ वा.च्या सुमारास आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. गेल्या ६ महिन्यातील याच परिसरातील ही चौथी घटना होती. तरी देखील ठेकेदार कंपनी यासंदर्भात वेळोवेळी निष्काळजीपणा दाखविते असा आरोप नागरिकांचा असून त्याविषयी रोष निर्माण झाला आहे. पाणी घुसलेल्या घरांमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, अशी मागणी होत आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी ही मागणी मान्य करत नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्‍वासन दिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता ठेकेदार ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीने घुमजाव केले. यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी लांजा तहसीलदार कार्यालयावर धडक देत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून घेतले. निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी नरेश सितलानी यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने नागरिकांचा पारा आणखीनच चढला. परिणामी, नागरिकांनी ठेकेदार कंपनीला २ दिवसांचा अल्टीमेटम देत बुधवारी ५ नोव्हेंबरपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही तर गुरुवारी ६ नोव्हेंबर रोजी महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. आता आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही अशी भूमिका नुकसानग्रस्त नागरिकांकडून घेण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, आमदार किरण सामंत यांच्यासमोर ठेकेदार कंपनीने नागरिकांना आश्वासन दिल्यामुळे या चर्चेदरम्यान आमदार किरण सामंत यांच्याशी नागरिकांनी थेट फोनवर संपर्क साधला. यावेळी आमदार सामंत यांनी मी सध्या मुंबईत असून दोन दिवसांत लांजात येणार आहे. जर ठेकेदार कंपनीने आश्वासन दिल्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही, तर मी स्वतः घटनास्थळी येवून ठेकेदार कंपनीच्या विरोधात कारवाई करेन असे सांगितल्याची माहिती काही नागरिकांनी पत्रकारांना दिली. याप्रसंगी तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीतदरम्यान राजेश राणे, प्रकाश लांजेकर, अभिजित राजेशिर्के, पंढरीनाथ मायशेट्ये, बाबा धावणे, मंगेश लांजेकर, सचिन लिंगायत, सुरेश करंबळे, सलमान देवानी, मोहम्मद देवानी, मुकरम देवानी, अनिकेत शेट्ये, राजेश भडेकर, नौशाद नेवरेकर, साहिल इसानी, वसीम मुजावर, अब्दुलरहेमान मुजावर, मोहन तोडकरी, बाबू गुरव, रिजवान इसानी आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

काम बंद पाडण्याचा इशारा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg