loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला विंधन विहीरीसाठी आम. दिपक केसरकर यांनी आमदार फंडातून दिला निधी

सावंतवाडी- सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असते त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी आमदार फंडातून दोन लाख रुपयांची विंधन विहीर मंजूर केली आहे. याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. परब म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी खर्च केला आहे. मात्र ते कधीच श्रेय घेत नाही. संजू परब म्हणाले, आमदार आणि मंत्री म्हणून दिपक केसरकर यांनी विविध पातळ्यांवर काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपजिल्हा रुग्णालयाकडे त्यांचे लक्ष असते. उपजिल्हा रुग्णालयात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असते त्यामुळे विंधन विहिरीचे पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आमदार फंडातून दोन लाख रुपये मंजूर केले आहेत. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा निता कविटकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, शहर अध्यक्ष खेमराज कुडतरकर, अजय गोंदावळे, भारती मोरे, अर्चित पोकळे, देव्या सूर्याजी, परिक्षीत मांजरेकर, डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ पांडुरंग वजराटकर आदी उपस्थित होते. रुग्णालयात समिती सदस्य देव्या सूर्याजी यांनी विधंन विहिरीची गरज आमदार दीपक केसरकर यांच्याकडे व्यक्त केली होती. यावेळी डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सर्वांचे स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

आमदार फंडातून दोन लाख रुपये मंजूर केले

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg