loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचा राजू तावडे यांना 'जीवन गौरव ' पुरस्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचा सुवर्ण महोत्सव महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संपन्न झाला. यावेळी संघटनेच्या मागील पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सक्रिय सभासदांचा सन्मान करण्यात आला. राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजू तावडे यांना राज्य संघटनेचे अध्यक्ष जकी अहमद जाफरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन 'जीवन गौरव ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुधीर गभणे, उपाध्यक्ष रवींद्र बिंड, उपाध्यक्ष राहुल साळुंखे, कोषाध्यक्ष सौ. वंदना परिहार, अतिरिक्त सरचिटणीस विनायक जोशी, सहकोषाध्यक्ष अमोल सुपेकर, महिला प्रतिनिधी स्वाती डोकबाणे, दिपाली खोबरे, मंत्रालय संपर्कप्रमुख बन्सीलाल राठोड , श्रीकृष्ण आपटे, सुवर्ण महोत्सव कोर कमिटीचे निमंत्रित सदस्य वाल्मीक दारुणकर, राजेंद्र करपे, नझीर शेख, स्वागताध्यक्ष तथा कोकण विभागीय सचिव नरेंद्र महाडिक व सर्व विभागीय सचिव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg