loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड किल्ला येथे शिवरायचरणी रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

पनवेल :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रायगड किल्ला येथे विनम्र अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाराष्ट्रातील युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी, असा संदेश दिला.या प्रसंगी त्यांनी रायगड किल्ल्यावर उपस्थित राहून महाराजांच्या समाधीस पुष्प अर्पण करून नतमस्तक होत अभिवादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, बिपीन माम्हूणनकर, पनवेल पुर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, प्रशांत मोरबाळे, आदी उपस्थित होते. यावेळी महाडकरांच्यावतीने बिपीन माम्हूणनकर व ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उपस्थितीतांचे स्वागत केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg