loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष....

वरवेली (गणेश किर्वे) - देशाच्या अखंड एकतेचे प्रतीक आणि देशाची एकता टिकवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे, भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिवस परेड पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या परेडमध्ये महाराष्ट्राच्या आकर्षक व वैचारिक चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथाचे नेतृत्व कोकणातील गुहागर तालुक्यातील जानवळे येथील सिद्धेश विलास जालगावकर यांनी केले. अष्टत्त्व, एकत्व विचारधारा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मूलमंत्र तसेच शक्ती, ज्ञान, दृष्टी, सुरक्षा, योग आणि समृद्धीसारख्या तत्त्वांचे प्रभावी सादरीकरण करून महाराष्ट्राचे नाव देशभरात उज्ज्वल केले. जालगावकर यांनी केवळ नेतृत्वच नाही तर नृत्य दिग्दर्शनाची धुराही समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या संकल्पनाशीलतेने आणि कलात्मक दिग्दर्शनाने महाराष्ट्राच्या परंपरेचा व विचारधारेचा संगम प्रभावीपणे रंगमंचावर साकारला. या झक्कीमध्ये एकूण १४ नृत्यकलाकारांचा सहभाग होता. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, वीरतेचा आणि एकतेचा संदेश नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहभागी कलाकारांमध्ये मयूर सोनवणे, शुभम सांगले, वेद खंडागले, श्लोक खंडागले, करण चौबे, मयुरेश कदम, मोनिका पाटील, रश्मी झा, संचिता इंदुलकर, दीक्षिता काटे, ध्रुव गद्दम, चैतन्य बोर्‍हाडे आणि मच्छिंद्र पाटील यांचा समावेश होता. केवडियातील एकता दिवस परेडमध्ये महाराष्ट्राच्या कलाकारांनी आपल्या उत्साहाने, नृत्यकौशल्याने आणि देशभक्तीने सजलेल्या सादरीकरणाने भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेला नव्या एक उंचीवर नेले. रथाच्या सादरीकरणाने केवडियाच्या प्रेक्षकांसह देशभरातून आलेल्या पाहुण्यांचेही मन जिंकले. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लक्षवेधी सादरीकरण म्हणून विशेष दाद मिळाली. उपस्थित मान्यवरांनी कलाकारांचे कौतुक केले. एकता आणि अखंडतेचा विचार भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक श्वासात आहे. महाराष्ट्राच्या या चित्ररथाने त्या विचारांना सजीव रूप दिले, असे उपस्थितांनी आवर्जून सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

जानवळे येथील सिद्धेश जालगावकरने केले नेतृत्व

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg