loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक संस्थांमध्ये युवकांनी सहभागी व्हावे : दत्ताराम दळवी

मुंबई : समाजात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही समाजाचे देणे लागते आणि ते देणे कोणत्याही प्रकारे आपल्याला फेडावेच लागते. म्हणून प्रत्येकाने समाजसेवेचे व्रत अंगीकारणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक तरुणाने आपले वाडवडील जी संस्था आजपर्यत चालवित आलेले आहेत ती आधुनिकतेने पुढे घेऊन चालवणे अंगीकारले पाहिजे. कारण आताची तरुण पिढी ही इंटरनेट व संगणकिय विद्येने पारंगत आहेत. त्याचा उपयोग तरुणांनी सामाजिक संस्था चालविण्यासाठी करावा असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम दळवी यांनी आदर्श शिक्षण समितीने आर्य समाज लोअर परेल येथे आयोजित केलेल्या ६४ व्या वर्धापनदिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभात केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आदर्श शिक्षण समितीचे तहहयात विश्वस्त शांताराम गोवळकर यांनी समितीला नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात ठेऊन आर्थीक बाजु भक्कम करुन ठेवलेली आहे. म्हणून समिती आज असे खर्चीक कार्यक्रम घेऊ शकते. असेही दळवी पुढे म्हणाले. प्रास्ताविक आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनंत दाभोळकर यांनी गेल्या ६४ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. सरचिटणीस भरत पाटणकर यांनी पाहूण्यांचे, गौरव केलेल्या विद्यार्थ्यांचे आणि उपस्थित सर्व सभासद बंधु भगिनिंचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg