loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगर परिषद निवडणुका : प्रभाग १ मध्ये शिवसेनेत रस्सीखेच सुरू; उमेदवारांच्या नावांवरून कार्यकर्ते आक्रमक

रत्नागिरी (वार्ताहर) : नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांमध्ये तिकीटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये अंतर्गत धुमशान माजले असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गटबाजीचे स्वरही उमटू लागले आहेत. आज मंगळवारी सायंकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे बिगुल आजच वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आला असून, “तिकीट आपल्यालाच मिळावे” यासाठी अनेकांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रभाग क्रमांक १ मध्ये सध्या शिवसेनेचे संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून रोशनभाई फाळके, प्रीतम आयरे, स्वप्नील शिंदे, शशी आमीम, मनीषा बामणे आणि श्रेया शिंदे या नावांची चर्चा आहे. या सर्वांमध्ये तिकीटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, कार्यकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, या प्रभागाचे माजी नगरसेवक रोशनभाई फाळके यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी, अशी मागणी काही वरिष्ठ शिवसैनिकांकडून जोर धरत आहे. स्थानिक स्तरावर फाळके यांचा प्रभाव आणि कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे संबंध यामुळे त्यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर शिवसैनिक लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार असून, उमेदवारी जाहीर करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी ते करणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये उमेदवारी कोणाला मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg