loader
Breaking News
Breaking News
Foto

वैष्णवी शेट्ये सी.ए. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोली तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातील विषयतज्ञ विद्या सार्दळ यांची सुकन्या वैष्णवी विजयकुमार शेट्ये हिने अतिशय खडतर सराव करुन पहिल्याच प्रयत्नात सी.ए.(सनदी लेखापाल) परीक्षेत प्रथम श्रेणीत प्राविण्य मिळवत सुयश संपादन केले. तिच्या यशाबद्दल दापोलीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड आदिंनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मायलेकींचा गौरव केला आणि शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी विद्या सार्दळ यांनी मुलगी वैष्णवीने पहिल्याच प्रयत्नात अंतिम सीए परीक्षा उत्तीर्ण करतांना तिने फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या तिन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या असून तिचे कठोर परिश्रम, समर्पण, प्रयत्न, उत्साह, दृढनिश्चय आणि अगणित तासांचा अभ्यास खरोखरच फळाला आला असल्याचे सांगितले. यावेळी गट साधन समुहातील विषयतज्ञ जयप्रकाश फडकेंसह सर्व साधन व्यक्ती तसेच शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg