loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरीच्या विधी गोरे व आयुष जाधवची महाराष्ट्र संघात निवड

खेड (प्रतिनिधी) - दि. 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान तायक्वाँडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वाँडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने डेरवण, चिपळूण येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या आयुष जाधव व विधी गोरे या खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. सदरच्या स्पर्धेत राज्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुवर्णपदक पटकावून आयुष व विधी यांनी आपले व रोटरी स्कूलचे नाव रोशन केले आहे. कोरमंगलम इनडोअर स्टेडियम, बेंगलोर (कर्नाटक) येथे दि. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या 42 व्या राष्ट्रीय तायक्वॉडो ज्युनियर क्युरुगी चॅम्पियनशिप 2025 राष्ट्रीय स्पर्धेत आयुष जाधव 59 किलो खालील व विधी गोरे 68 किलो वरील वजनी गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यासाठी महाराष्ट्र संघ 29 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक व तायक्वॉडो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg