loader
Breaking News
Breaking News
Foto

कारीवणी नदी पुलावरील स्लॅबमधील लोखंडी शिगा पडल्या बाहेर ; वाहतूक झाली धोक्याची

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणाहून कोडजाई पुलावरून पुढे साखळोली शिवाजीनगर गावतळेकडे जाणा-या मार्गावर कारीवणी नदीवर पुल आहे. या पुलाचा स्लॅब उखडून लोखंडी शिगा बाहेर आलेल्या आहेत. त्यात पुलावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून राहत असल्यामुळे स्लॅब उखडून स्लॅबबाहेर आलेल्या पाण्यातील शिगा दिसून येत नाहीत त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील साखळोली , शिवाजीनगर , गावतळे , असोंड , शिवनारी , रुखी , संगलट , कोंढे , फणसू आदी गावांकडे जाण्यासाठी महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या महत्त्वाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg