loader
Breaking News
Breaking News
Foto

सात बायांचा आसरा, आयांचे पाणी, वाघ बार्शी उत्सवात साजरी

दाभोळ - अत्यंत पवित्र असलेले हे मंदिर दाभोळ मधील श्री स्वयभू चंडिका मंदिर आणि देवी इंगळाई मंदिर एवढेच सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत असलेले एक पवित्र मंदिर आहे. दाभोळ मधील बाजार विहिरीच्या पुढील जाधववाडीच्या वरील डोंगरावर साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. सुंदर अस ठिकाण पाहून मन प्रसन्न होत. बाजूला सतत वाहणारा पाण्याचा झरा आहे. दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी किंवा तुळशी विवाह प्रारंभ या दिवशी येथे सात बायांचा उत्सव साजरा करून बाघबारशी ही प्रामुख्याने जाधववाडी आणि ग्रामस्थ साजरी करतात. या दिवशी येथे महाप्रसाद होतो आणि जवळ जवळ ३०० ते ३५० भक्त गण याचा लाभ घेतात. सदर देवी ही नवसाला पावते व प्रसाद ग्रहण केले तरी मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी या देवी ची ख्याती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दाभोळ येथे हे वसलेले अतिशय सुबक मंदिर आहे व येथे जाधव वाडी मधील सर्व जण गुण्या गोविंदाने साजरा करतात. काही मंडळी मुंबई वरून दर्शनासाठी येतात. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवज्योत मित्र मंडळ जाधववाडी दाभोळ यांनी खूप मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg