loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प राबविताना गुहागर शहरातील एकमेव क्रीडांगण नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याबाबत आमदार भास्कर जाधव यांना निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प राबविताना गुहागर शहरातील एकमेव क्रीडांगण नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याबाबत आमदार भास्कर जाधव यांना गुहागर शहरातील काही नागरिक व क्रीडा प्रेमींच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गुहागर शहरातील एकमेव व ऐतिहासिक पोलीस क्रीडांगण हे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि सामाजिक संस्थांसाठी गेली अनेक दशके केंद्रबिंदू राहिले आहे. या मैदानावरच विविध शालेय, क्रीडा, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रम (उदा. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, परेड, कबड्डी, खो-खो, क्रिकेट स्पर्धा, उत्सव इत्यादी) पार पडत असतात. अलीकडे ब्ल्यू फ्लॅग बीच प्रकल्पाच्या नावाखाली या मैदानावर बांधकामे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या कामांमुळे मैदानाचा मूळ आकार, वापर व ओळख नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमचा ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पाला विरोध नसून पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनाचे स्वागतच आहे. परंतु या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत स्थानिकांच्या मतांची दखल न घेता, खेळाचे मैदान नष्ट होईल अशा रचनेची कामे केली जाणे हे अन्यायकारक आहे. गुहागर शहरातील हे एकमेव सार्वजनिक क्रीडांगण आहे. येथेच शालेय विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांना क्रीडा क्रियाकलापांची संधी मिळते. क्रीडांगण नष्ट झाल्यास स्थानिक क्रीडा संस्कृतीचा पाया कोसळेल, तसेच पुढील पिढ्यांना खेळण्याची जागा उपलब्ध राहणार नाही.

टाईम्स स्पेशल

क्रीडा प्रेमींच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये. ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पाअंतर्गत पोलीस क्रीडांगणावर कोणतेही बांधकाम, पार्किंग वा कायमस्वरूपी रचना उभारली जाणार नाही, याची लेखी खात्री द्यावी. खेळाच्या क्रीडांगणाचे संपूर्ण क्षेत्र कायम राखून त्याचे सुशोभीकरण (स्वच्छता, फेन्सिंग, बसण्याची सोय इ.) करण्यात यावे. गुहागरच्या मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी हे क्रीडांगण गुहागर क्रीडांगण आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावे. गुहागर शहराच्या संदर्भातील सर्व महत्वाच्या प्रकल्पाचे आराखडे व प्रस्ताव सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करून स्थानिक नागरिकांना व समाजसंस्थांना विश्वासात घेण्यात यावेत असेही शेवटी गुहागर शहरातील नागरिक व क्रीडाप्रेमी यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg