loader
Breaking News
Breaking News
Foto

​माजगावचा सौरभ सावंत बनला 'चार्टर्ड अकाउंटंट'

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​सावंतवाडी तालुक्यातील माजगाव हरसावंतवाडा येथील सौरभ मालोजी सावंत या युवकाने अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत 'चार्टर्ड अकाउंटंट' (CA) बनण्याचा बहुमान मिळवला आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर, तसेच गंभीर शारीरिक अडचणींवर मात करून त्याने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. ​अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही कठोर मेहनत घेऊन संकटांवर कशी मात करावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौरभ सावंत ठरला आहे. सीए परीक्षेत यश मिळवण्यापूर्वी त्याच्या डोळ्याला गंभीर जखम झाली होती, ज्यामुळे त्याला जवळपास दोन वर्षे अभ्यासापासून दूर राहावे लागले. पण त्याने हिंमत न हारता, जिद्दीने पुन्हा पुस्तके हाती घेतली. त्याने सीए. लक्ष्मण नाईक यांच्याकडे आर्टिकलशिप पूर्ण केली आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन घेतले. ​वडील अकाली देवाघरी गेले असले तरी, त्याची आई आणि भावांनी त्याला भक्कम साथ दिली. याच जबरदस्त इच्छाशक्ती आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर सौरभने हे देदिप्यमान यश संपादन केले आहे. ​सौरभच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्र आणि गावातील नागरिकांकडून त्याचे विशेष कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg