loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली संघर्ष समिती वतीने मणेरी पं. स. मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा ग्रुप कमिटी बैठकीत निर्णय

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील समस्या तसेच विकास कामे तक्रारी याकडे निवडून आल्यानंतर अनेक जण दूर्लक्ष करतात. गावातील ग्रामस्थांच्या तक्रारीची, कामाची दखल घेतली जात नाही. तेव्हा आपल्या हक्काचा उमेदवार उभा करण्यासाठी सासोली संघर्ष समिती यांनी पुढाकार घेतला आहे. मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय सासोली येथे पार पडलेल्या ग्रुप कमिटी बैठकीत घेण्यात आला. लवकरच मतदारसंघ गावाचा दौरा करून आपले विचार मतदार पर्यंत पोहोचले जातील असे ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मणेरी पंचायत समिती मतदारसंघ हा खुला प्रवर्ग राखीव पडला आहे. यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या गावातील उमेदवार उभा झाला पाहिजे असा निर्णय सासोली बचाव ग्रुप कमिटी यांनी घेऊन सासोली संघर्ष समिती माध्यमातून अपक्ष उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सासोली बचाव संघर्ष समिती ग्रुप बैठक सोमवारी रात्री घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेतला गेला.

टाईम्स स्पेशल

गेल्या काही वर्षांत राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून दिले पण दरवेळी गावातील ग्रामस्थ याना वेठीस धरले जाते, अन्याय केला जातो, विकास कामे केली जात नाही. फिरकून बघितले जात नाही तेव्हा राजकीय पक्ष बाजूला ठेवून मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून मतदार संघातील लोकांना जनतेला साथ देणारा अपक्ष उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीमध्ये मनोज गवस, महेश ठाकूर, आनंद ठाकूर, बापू सावंत, संदेश भुजबळ, संतोष परब, संजय गाड, उपस्थित होते. लवकरच मणेरी पंचायत समिती मतदार संघात येणार्‍या गावात जाऊन आपले विचार पटवून देण्याचा निर्णय घेतला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg