loader
Breaking News
Breaking News
Foto

हातनूर येथे मोराची शिकार करणाऱ्या महाड मधील सहा ऊस तोड कामगारांना अटक

महाड - सांगली जिल्ह्यातील हातनूर येथे सहा ऊसतोड कामगारांनी दोन मोरांची शिकार केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून शिकार करणारे सर्वजण महाड मधील रहिवासी असून त्यांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हातनूर परिसरात ऊसतोड करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झाली होती. ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वीच आला होता. त्यामुळे त्यांच्यावर ग्रामस्थ लक्ष ठेवून होते. शनिवार एक नोव्हेंबरला रात्री अजित सोनटक्के यांच्या शेतात झाडावर बॅटरीचा उजेड दिसला. तेव्हा रात्री दहा वाजता सचिन पाटील, उत्तम पाटील, शिवम पाटील, अजित सोनटक्के, बाळासाहेब पाटील यांच्यासह 25 हून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी या टोळीला घेरून ताब्यात घेतले. या कामगारांनी दोन मोरांची शिकार केली असल्याची माहिती तासगावच्या वनक्षेत्रपाल कल्पना पाटील यांना मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळजचे वनपाल सागर पताडे, पेडचे वनसंरक्षक सुनील पवार, वडगाव येथील वनरक्षक दीपाली सागावकर, वनरक्षक दत्तात्रय बोराडे, राजकुमार मोसलगी, प्रतीक मरडे यांच्या पथकाने त्या कामगारांना ताब्यात घेतले आहे.

टाइम्स स्पेशल

वामन लक्ष्मण जाधव (वय 36, रा. कुंभार्डे, ता. महाड, ), रत्नाकर अर्जुन पवार (39, रा. आंबवली, ता. महाड), किशोर काशीराम पवार (22, रा. सापेगाव), सचिन बाळकृष्ण वाघमारे (23), सत्यवान बाळकृष्ण वाघमारे (21) नितीन बाळकृष्ण वाघमारे (20, तिघेही रा. चोचिंदे, ता. महाड) अशी या ऊसतोड कामगारांची नावे आहेत. या कामगारांनी मांस खाण्याच्या उद्देशाने दोन मोरांची शिकार केल्याचे आढळून आले. वनविभागाने त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg