loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई येथील श्रीमती सुमित्रा घोसाळकर यांचे वृध्दापकाळाने निधन

कडवई (ता. संगमेश्‍वर) - येथील सुप्रतिष्ठीत नागरिक व घोसाळकर कोंड विकास मंडळाचे धडाडीचे सदस्य महेंद्र रामचंद्र घोसाळकर यांच्या मातोश्री श्रीमती सुमित्रा रामचंद्र घोसाळकर यांचे सोम. दि. ३ नोव्हें. रोजी सकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल कडवई पंचक्रोशीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीमती सुमित्रा घोसाळकर या आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या. त्या सर्वांशी आपुलकीने वागत त्यामुळे त्यांच्या विषयी कडवई पंचक्रोशीत मोठा आदरभाव वसत आला होता. त्यांचे सोम. दि. ३ नोव्हें. २०२५ रोजी सकाळी ७ वा. वृध्दापकाळातील आजारपणामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त काही वेळातच कडवई परिसरात पसरले. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल कडवई पंचक्रोशीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

त्यांचेवर सोम. दि. ३ रोजी दुपारनंतर कडवई येथील घोसाळकर कोंड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी सर्व घोसाळकर बांधवांनी प्रार्थना केली. तसेच त्यांना कडवई पंचक्रोशीतील अनेकांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg