loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणचे ‘खलबतखाने’ गजबजले! विलक्षण वेगवान हालचालींना ऊत

चिपळूण(प्रतिनिधी) - ‘‘उद्या बुधवार दि. ५ नोव्हेंबर पासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता, खुद्द महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. निवडणुकांचे वेळापत्रक’’ हे वृत्त दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे सोमवार दि. ३ नोव्हेंबरचे अंकात प्रसिध्द होताच चिपळूण, खेड, दापोली पासून ते रत्नागिरी, देवरुख, गुहागर, लांजा, राजापूर पर्यंत चर्चेला प्रचंड उत आला.. चिपळूण पासून ते रत्नागिरी पर्यंतचे राजकीय पक्षांचे ‘खलबतखाने’ गजबजून गेले व वेगवान राजकीय घडामोडींना ऊत आला. महायुतीचा घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी जणू निवडणुकांचे वेळापत्रकच जाहीर केले. बुध. दि. ५ नोव्हें. रोजी राज्यात निवडणुका जाहीर होतील आणि त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल असा जाहीर अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, ‘‘५ नोव्हेंबर रोजी नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर होतील. तसेच १५ डिसेंबरला जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचे मतदान होईल आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरु असताना राज्यातील सर्व महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होतील व त्यांचे मतदान १५ जानेवारीला होईल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार ३१ जानेवारी पूर्वी सर्व निवडणूका पूर्ण होतील’’ असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महायुतीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे हे वक्तव्य दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे सोमवारच्या अंकात प्रसिध्द होताच मुंबई पासून संपूर्ण कोकणात राजकीय उलाढालींना वेग आला. चिपळूणमधील राजकीय ‘खलबतखाने’ गजबजून गेले.. वेगवान राजकीय घडामोडींना ऊत आला. चिपळूणचा नगराध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली असून त्याबाबत राजकीय मंडळींमध्ये तसेच जनतेमध्ये तर्क वितर्क सुरु झाले आहेत. रमेशभाई कदम चिपळूणचे ‘हेवीवेट’ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते रमेशभाई कदम यांचे नाव राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिपळूणच्या नगराध्यक्षपदासाठी मुक्रर केल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिध्द झाले होते. रमेशभाई कदम हे चिपळूण शहरातीलच नव्हे तर विधानसभा मतदार संघातील एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे नाव पुढे येताच जनतेतून त्यांना उत्स्फूर्त पाठींबा मिळाला.

टाइम्स स्पेशल

रमेशभाई कदम यांनी यापूर्वीही चिपळूणचे नगराध्यक्षपद भुषविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात कितीतरी विकास कार्ये पार पडली. चिपळूण शहराचा खडानखडा अभ्यास असणारे एक उमद्या स्वभावाचे नेते म्हणून ते ओळखले जातात रमेशभाई कदम यांचे चिपळूणच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नाव निश्‍चित करुन खा. शरद पवार यांनी अचूक डाव टाकल्याची चर्चा सार्‍या चिपळूण शहरात सुरु झाली. रमेशभाई कदम यांच्यासारखा ‘हेवीवेट’ उमेदवार चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुक रिंगणात उतरला तर त्यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यावी याचा खल आता अन्य राजकीय पक्षांच्या गोटात सुरु झाला आहे. अशातच महायुतीचे एक ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आता आचारसंहिता लागू होणार हे जाहीरपणे सांगितल्याने या चर्चेला ऊत आला आणि चिपळूणातील राजकीय ‘खलबतखाने’ गजबजून गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg