loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोग्य सुविधा बळकटीसाठी भरीव निधीची तरतूद - नामदार योगेशदादा कदम

खेड (प्रतिनिधी)- प्रायमरी हेल्थकेअर फाउंडेशन, पुणे मार्फत सी.एस.आर. निधीच्या माध्यमातून दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पिसई मधील नूतनीकरण कामाचा भुमिपुजन सोहळा गृहराज्य मंत्री ना.योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ५० लाखांचा निधी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खर्च केला जाणार असून, यामध्ये अद्यावत ऑपरेशन थिएटर, शौचालय बांधणी व इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील काळात मतदार संघात प्राथमिक आरोग्यकेंद्रासाठी अडीच कोटींची विकासकामे प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी मंत्रीमहोदयांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भूमिपूजन प्रसंगी प्रायमरी हेल्थकेअर फाउंडेशनचे सल्लागार निलेश सावंत, तहसिलदार श्रीमती बोंबे, गटविकास अधिकारी मंडलिक,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य सुनील दळवी, माजी जि. प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, शाखाप्रमुख मिलिंद खानविलकर, सरपंच वसंत येसरे, तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg