loader
Breaking News
Breaking News
Foto

एमआयडीसीमध्ये गृहउपयोगी व सुरक्षा संच घेण्यासाठी कामगारांची विक्रमी गर्दी!

रत्नागिरी (जमीर खलफे) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे कामगारांसाठी मोफत गृहउपयोगी संच आणि अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात येत आहे. या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी आज रत्नागिरी एमआयडीसी परिसरात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच रत्नागिरी एमआयडीसीच्या वाटप केंद्रावर महिला आणि पुरुषांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आपल्या हक्काचा संच घेण्यासाठी कामगार बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. ही गर्दी केवळ तात्पुरती नसून, संचाचे वाटप सुरू झाल्यानंतरही ती कायम आहे आणि दिवसभरात यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही भाग्यवान कामगार संच घेऊन समाधानाने बाहेर पडताना दिसत आहेत, तर मोठ्या संख्येने लोक अजूनही संयमाने आपल्या वस्तूंसाठी प्रतीक्षेत उभे आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजनेमुळे बांधकाम कामगारांना घरगुती वापराच्या वस्तू आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करणारी साधने मोफत मिळत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. ही गर्दी म्हणजे एका अर्थाने शासनाच्या कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी आणि कामगारांचा प्रचंड विश्वास दर्शवते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg