loader
Breaking News
Breaking News
Foto

परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) वाहतूकीवर धडक कारवाई दोघांना अटक :१ कोटी ३१लाख ५२हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

ठाणे दि.४ (प्रतिनिधी ) परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) पनवेल-मुंब्रा रोडवरील, एक्ससीएमजी प्रा. लि. कंपनीसमोर टेम्पोने विक्रीकरिता येत असताना राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली विभागाने वाहतूकीवर धडक कारवाई करीत आरोपीला अटक करून दोघा आरोपीसह सहाचाकी ट्रक व मद्यासह एकूण १ कोटी ३१लाख ५२हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रदिप पवार विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग, ठाणे, प्रविण तांबे ,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे, वैद्य,उपअधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, ठाणे, पोकळे ,उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नवी मुंबई, ए.डी. देशमुख, उपअधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील (गोवा) मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने पनवेल-मुंब्रा रोडवरील, एक्ससीएमजी प्रा. लि. कंपनीसमोर, उत्तरशीव, ता. जि. ठाणे येथे ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी दारूबंदी गुन्हयाकामी गस्त घालत असताना सुमारे सकाळी साडे नऊ वाजता आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा सहाचाकी टेम्पो क्र. MH-२०-GC-६४५० या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनास थांबवुन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्यातील भा.ब. विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) बॉक्स असल्याचे दिसून आले. सदर वाहतुकीवर छापा घालून त्यामध्ये एकूण १००० बॉक्स मद्याची किंमत रू. १,कोटी ०५,लाख ६०,हजार असून परराज्यातील भा. ब. विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) चे दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त केले आहे. सदर गुन्हयामध्ये आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा सहाचाकी ट्रक व मद्यासह एकूण १ कोटी ३१लाख ५२हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद समशाद सलमानी (वाहनचालक) व आरोपी देवेंद्र खुमाराम मेघवाल यांना अटक केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg