खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोमवारी संध्याकाळी अत्यंत दुःखद घटना घडली. धामणंद गावातील काजू फाटा परिसरातील नागझरी नदीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत पंधरा वर्षीय मुलीसह गुहागर येथील दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लावण्या विजय पारखे (वय १५, रा. साखरखेड), नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८) आणि विराज किशोर जाधव (वय १२, दोघेही रा. गुहागर) अशी मृतांची नावे आहेत. उन्हाळी सुट्टी निमित्त हे सर्वजण गावी आले होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, तिघांनाही वाचवण्यात अपयश आले. या घटनेनंतर धामणंद गावासह खेड तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.