पनवेल - महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतींचा जल्लोष आणि भव्य-दिव्य आयोजनाचा दिमाख… अशा उत्साहपूर्ण वातावरणात कामोठे येथे “ परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” हि जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली. भाजपचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे सेक्टर ०६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने अक्षरशः “मिनी महाराष्ट्र केसरी”चा अनुभव उपस्थितांना दिला. नेपाळ, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांतील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला. यामधील मुख्य स्पर्धेतील विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित आले. या कुस्ती सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी बोलताना आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. कुस्ती स्पर्धेच्या वातावरणाचे कौतुक करताना ते म्हणाले की, माझा आणि कुस्तीचा थेट संबंध दिसेल असे वाटत नाही, कारण आमचा आखाडा वेगळा आहे. आमचा आखाडा हिंदुत्वाचा असून आम्ही रोज 'हिरवे साप' ठेचतो, त्यामुळे या आखाड्यात आणि आमच्या आखाड्यात फरक आहे. पुढे बोलताना राणे म्हणाले की, साधारणपणे एवढी भव्य कुस्ती स्पर्धा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच पाहायला मिळते असा एक समज आहे. मात्र, आज कामोठ्यात झालेली ही गर्दी आणि आयोजन पाहिल्यानंतर आम्हीही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कुठेही कमी नाही, असाच स्पष्ट संदेश परेश ठाकूर यांच्या माध्यमातून गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येणे हे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाची वाढती ताकद दाखवणारे आहे, असे सांगत परेश ठाकूर यांचे भविष्य उज्वल असल्याचे सांगून वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. या भव्य 'परेश ठाकूर केसरी' कुस्ती स्पर्धेने संपूर्ण पनवेल आणि रायगड जिल्ह्यात एक नवा इतिहास रचला असून, या अभूतपूर्व क्रीडा सोहळ्याची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हे दोन्ही सुपुत्र करत आले आहेत. ते शांत पण धाडसी व्यक्तिमत्व असून लोकांना आधार आणि मदत देण्याचे काम करत असतात. कुस्ती आणि माझे जवळचे नाते आहे. हि स्पर्धा अत्यंत सुरेख असा अनुभवायला मिळाला, अशा शब्दात खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. तर आमदार निरंजन डावखरे यांनी कोकणच्या भूमीत पण कुस्तीवर प्रेम करणारी लोकं आहेत हे या कुस्ती सामन्यातून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले.































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.