loader
Breaking News
Breaking News
Foto

होमकॉन दापोली २०२५ हा कार्यक्रम नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न

दापोली : दापोली होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन दापोली आयोजित होमकॉन दापोली २०२५ हा कार्यक्रम गृह, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषधी विभाग राज्यमंत्री ना. योगेश कदम तसेच डॉ. सौ. विद्या चंद्रकांत मोकल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोल्डन हेरिटेज हॉटेल सैतवडेकर, दापोली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरातील प्रतिथयश डॉ. विवेक फाटक यांना दापोली होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ना. योगेशदादा कदम यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ना. योगेश दादा कदम यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अविरतपणे सेवा करणार्‍या सर्व डॉक्टर विशेषतः होमिओपॅथी डॉक्टरांचे विशेष कौतुक करून अशीच सेवा अविरतपणे करण्यासाठी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या मतदारसंघांमध्ये होमिओपॅथिक संघटनेच्या काही मागण्या असल्यास त्या तत्परतेने शासनाच्यावतीने पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमासाठी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, तालुकप्रमुख उन्मेष राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश शेठ, शहर प्रमुख पप्पू रेळेकर, उपशहर प्रमुख धनराज गुजर, महिला संघटिका दीप्ती निखार्गे, माजी सभापती ममता शिंदे, नगरसेविका कृपा घाग, शबनम मुकादम तसेच दापोली होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश लखमदे, सेक्रेटरी डॉ. काझीम खोत, खजिनदार डॉ. महेंद्र रेवाळे, खेड होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष विलायत मुकादम, दापोलीतील कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रसाद करमरकर तसेच दापोली होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व डॉक्टर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg