loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात सहा वर्षीय मुलीचा पाळीव कुत्र्याने घेतला चावा

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात चाळीच्या आवारात खेळत असताना पाळीव श्वानाने सहा वर्षीय मुलावर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली. श्वान मालकिणीने चिमुरडीच्या कुटुंबियांना धमकावले. याप्रकरणी श्वान मालक असलेल्या बापलेकीविरोधात १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार जयेश इंद्रकुमार गुप्ता (वय २८) हे कुटुंबासह शहीद भगतसिंग रोड परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा भाऊ योगेश गुप्ता हा कामानिमित्त छत्तीसगड राज्यात गेला असून त्याचा मुलगा रुद्रा गुप्ता (वय ६) कुटुंबासोबत ठाण्यात राहतो. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.२३ वाजण्याच्या सुमारास रुद्रा हा आपल्या मित्रासोबत चाळीतील शिव मंदिराच्या आवारात खेळत असताना तेथे राहणाऱ्या समृद्धी संजीत विश्वकर्मा व संजीत उमाशंकर विश्वकर्मा यांचा पाळीव कुत्रा अचानक त्याच्यावर धावून गेला. कुत्र्याने मुलाच्या मागील बाजूस मांडीवर चावा घेतल्याने तो जखमी झाला व घाबरून रडू लागला.

टाइम्स स्पेशल

दरम्यान त्या परिसरातील एका व्यक्तीने हस्तक्षेप करून कुत्र्याला दूर हटविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर जयेश गुप्ता यांनी कुत्र्याला सुरक्षिततेसाठी मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली असता, कुत्र्याची मालकिण समृद्धी विश्वकर्मा यांनी शिवीगाळ करत कुत्रा अंगावर सोडण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी कुत्रा मालक असलेल्या बापलेकीविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg