loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'सेवाभावी भारतीय' संस्थेतर्फे आरोग्य मार्गदर्शन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ​

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - 'सेवाभावी भारतीय संस्था' सावंतवाडीच्या वतीने माजगाव येथील श्री सिद्धिविनायक सभागृहात स्त्रियांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सावंतवाडी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांनी यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महिलांना सविस्तर माहिती दिली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांनी मुलींच्या वयानुसार होणारे शारीरिक बदल, मासिक पाळीचे समज-गैरसमज, गरोदरपणातील काळजी आणि गर्भाशयाच्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. तसेच, कॅन्सरची लक्षणे व स्वनिदान करण्याची पद्धत आणि रजोनिवृत्ती काळातील मानसिक बदलांवर त्यांनी प्रकाश टाकला. निरोगी आयुष्यासाठी समतोल आहाराचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सामाजिक बांधिलकी जपत डॉ. निगुडकर यांनी समाजातील २० आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियांसाठी मोफत सोनोग्राफी करून देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमात माजगाव परिसरातील आशा सेविकांचा सन्मानचिन्ह व रोपटे देऊन गौरव करण्यात आला. मार्गदर्शन पर भाषणानंतर महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना आठवण म्हणून फुलझाडाचे रोपटे प्रदान करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

संस्थेच्या सचिव श्रुती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा जान्हवी सावंत, उपाध्यक्ष गोविंद प्रभू, कार्याध्यक्षा अस्मिता परब, खजिनदार फरजाना मुल्ला यांच्यासह वेदिका सावंत, योगेश चव्हाण, प्रशांत गावकर व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला माजगाव, मळगाव, वेत्ये, सावंतवाडी आणि चराठा येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg