loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई दोडामार्ग येथील श्री देवी सातेरीचा कलश वर्धापनदिन भक्तीमय वातावरणात संपन्न

दोडामार्ग (प्रतिनिधी) - कसई दोडामार्ग गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा दहावा कलश वर्धापनदिन शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शेकडो भाविकांनी श्री देवी सातेरी, श्री देवी केळबाय, श्रदेव सत्यनारायण महापूजा, तसेच इतर देवता यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला तर काही महिलांनी देवीची ओटी भरली. दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवसाला पावणारी श्री देवी सातेरी, देवी केळबाय, या देवतांच्या कलश दहावा वर्धापनदिन शनिवारी पार पडला. या निमित्ताने मंदिरात देवी मूर्ती सजवण्यात आली होती. या अगोदर अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा झाली. यानंतर शेकडो भक्तांच्या उपस्थितीत आरती झाली. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद आयोजित केला होता. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. दहावा कलश वर्धापनदिन कसई दोडामार्ग गावातील तसेच इतर गावातील भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसाद लाभ घेतला. देवी सातेरी केळबाय देवस्थान उत्सव समिती तसेच ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले होते. मानकरी ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

शेकडो भाविकांनी घेतले दर्शन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg