loader
Breaking News
Breaking News
Foto

तुम्बाड येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट व दंत तपासणी शिबिर

खेड : रोटरॅक्ट क्लब ऑफ खेड सिटी, योगिता डेंटल कॉलेज खेड आणि गीताई लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, तुम्बाड येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. या शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी तसेच दंत आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना दातांची योग्य स्वच्छता, आरोग्याची काळजी व निय तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अध्यक्ष यश पाटणे, सचिव गौरव पाडळकर तसेच सदस्य ऋतूज बेंडखळे आणि चाणक्य कवळे यांनी विशेष सहकार्य केले. समाजामध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg