सावंतवाडी : माजी सैनिकांनी जिद्दीने उभारलेल्या या भवनाचे कौतुक करत “हे वेर्ले येथील उभारण्यात आलेले भवन केवळ इमारत नसून येणाऱ्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरेल असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी काढले. माजी सैनिक उत्कर्ष मंडळ वेर्ले याच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच माजी सैनिक भवनाचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर, निवृत्त सुभेदार मेजर ज्ञानदेव मोरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सैनिक पतसंस्थेचे सुनिल राऊळ, सरपंच रूचिता राऊळ, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, बाळकृष्ण राऊळ, चंद्रकांत राणे, राजाराम राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, बाळकृष्ण लिंगवत, हनुमंत राणे, महादेव राणे, निवृत्त राजाराम राऊळ, भास्कर कोचरेकर, दिपक राऊळ, भरत गावडे, अशोक राऊळ आदिसह आजी माजी सैनिक संघटना माडखोल, शिरशिंगे, सांगेली, कारिवडे, गेळे, चौकुळ, आंबोली, वेर्ले येथील सैनिकांनी सहभाग घेतला.
केसरकर म्हणाले, शौर्याचा सन्मान माजी सैनिकांनी जिद्दीने उभारलेल्या या भवनाचे कौतुक करत “हे भवन केवळ इमारत नसून येणाऱ्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरेल.” शिवरायांचा आदर्श शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत असून त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी मानवंदना असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. विकासासाठी कटिबद्धत मतदारसंघातील विकासकामे आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. यावेळी केसरकर यांनी संघटनेचे कौतुक केले तसेच आपण सर्वजण एकत्र येऊन जे काम करत आहात ते समाजाला दिशा देणारे आहे, असे सांगितले. तसेच माजी सुभेदार मेजर मोरे यांनी ही माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले.
तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांनी आजी-माजी सैनिकांनी उभारलेल्या या सैनिक भावना सह नव्यानेच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कौतुक केले. सैनिकांनी स्वबळावर हे काम करून स्वताचा एक आदर्श निर्माण केला आहे. ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर राहून देशाची सेवा करतात, तसेच ते आपल्या भूमीसाठी तेवढे तप्तर असतात हे दाखवून दिले असे गौरव उद्गार सर्वच मान्यवरांनी काढले. या सोहळ्यास वेर्ले व परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. माजी सैनिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. शेवटी माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.





































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)








































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.