loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यात मंदिरांमधील चोऱ्यांचे सत्र सुरूच

खेड - खेड तालुक्यातील कशेडी कोंडवाडी येथील ग्रामदैवत श्री सुकाई कोटेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून हजारो रुपयांचे पितळी साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ माजली आहे. ही चोरी २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी रघुनाथ बाबा आंबेडे (वय ६०, रा. कशेडी कोंडवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंदिराचे दरवाजे उघडे असताना अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने मंदिरात प्रवेश केला. चोरट्याने मंदिरातील सुमारे १९,२०० रुपये किमतीचे जुने वापरते पितळी साहित्य चोरून नेले. यामध्ये प्रत्येकी १० किलो वजनाच्या १२ हजार रुपये किमतीच्या दोन पितळी घंटा, प्रत्येकी ५ किलो वजनाच्या ६ हजार रुपये किमतीच्या दोन घंटा आणि १,२०० रुपये किमतीची एक जुनी पितळी समई यांचा समावेश आहे. चोरीची घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी गावातील ग्रामस्थ आणि मुंबई मंडळातील सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. सर्वानुमते निर्णय झाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी खेड पोलीस ठाण्यात या चोरीबाबत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०५ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ अन्वये नोंद केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ग्रामदैवत सुकाई कोटेश्वरी मंदिरात चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg