लांजा (संजय साळवी) : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि अशोक लेलॅंड कंपनीचा टेम्पो असा एकूण २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवा बनावटीच्या दारूची मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक केली जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी निरीक्षक आर. जी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, जवान रोहीत लोंढे, सागर उबाळे व कर्मचारी यांनी मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्याच्या हद्दीतील हातिवले टोलनाका येथे पहाटे सापळा रचला होता. याचदरम्यान गोव्याहून आलेल्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलॅंड कंपनीचा बडा दोस्त या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्येगोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. त्यानंतर मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटी विदेशी मद्याचे यामध्ये टुबर्ग स्ट्रॉंग बिअर, किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे टीन व अन्य मद्यसाठा ज्याची किंमत १८ लाख १३ हजार १२० रूपये आणि वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला अशोक लेलॅंड कंपनीचा बडा दोस्त या टेम्पो ( क्र. एम .एच.०८ एपी ४३८७) किंमत ५ लाख ५० हजार रुपये असा एकूण २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी टेम्पो चालक चेतक भरत वाळवे (३० वर्षे, रा. तिवरे वाळवेवाडी, ता. कणकवली) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी आर. जी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हा
हातिवले टोलनाका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त





































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)








































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.