loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यात रवींद्र मानेच शेर असल्याचे सिद्ध, तीनही राजकीय शिष्यांना केले चितपट

देवरूख (सुरेश सप्रे) - संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे नेते व सुभाष बने, राजू महाडीक, भाजपाच्या रश्मी कदम यांचे राजकीय गुरू रवींद्र माने यांची कसोटी पणाला लागत गुरू विरुद्ध शिष्य असा सामना रंगला होता. यात गुरू हा गुरूच असतो हे रवींद्र माने यांनी सिद्ध करत तिन्ही चेल्यांना चितपट करत मात देत त्यांचा गुरूर उतरवत (जनतेच्या मदतीने) त्यांना घरी बसवत वर्तुळ पूर्ण करत रवींद्र माने हीच उबाठाची ताकद असल्याने यावेळीच्या निवडणूकीत सिद्ध झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात सन १९९० विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीकडून तात्कालिन तालुका प्रमुख रवींद्र माने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी शिवसेना भाजपा युतीच्या असंख्य कार्यकर्तेसह स्वयंसेवक संघाचे व भाजपाच्या अनेक जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व तालुक्यातील नवख्या शिवसैनिकांना बरोबर घेत तन, मन, धनाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत तरुण तडफदार अशा युवकाला विधानसभेत धाडले. विधानसभेत पहील्याच अधिवेशनात प्रथमच आमदार झालेल्या या युवकाने आपल्या पहिल्याच भाषणात वक्तृत्वाची चुणूक दाखवत बाळासाहेबांसह सर्वांच लक्ष वेधले घेतले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार झालेनंतर रवींद्र माने यांनी भाजपाच्या मदतीने तालुक्यातील विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. १९९२ च्या जि.प. च्या निवडणूकीत सेना-भाजपा युतीने पंचायत समितीवर भगवा फडकविण्यात यश मिळविले. त्यावेळी मुंबई स्थित सुभाष बने, जयराम रामाणे, दिपक खामकर यांचेसह राजेंद्र महाडीक, संतोष लाड, अशोक सप्रे, रश्मी कदम यांना रवींद्र माने यांनी राजकारणात पुढे आणत तालुक्यात शिवसेनेची मजबूत फळी निर्माण केली होती. मधल्या काळात शिवसेनेतून सुभाष बने, रश्मी कदम यांचेसह अनेक नेत्यांनी पक्षांतरे केली. पण ज्यांनी तालुक्यात शिवसेना रूजवली व वाढवली ते माजी मंत्री रवींद्र माने यांनी घरवापसी करत संघटनेची सर्व सुत्र हाती घेतली होती. १९९२ च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व राहिले. त्यावेळी रवींद्र माने यांनी मुंबईस्थित सुभाष बने, व राजू महाडीक यांना राजकारणात आणत निवडून आणले. त्यावेळी फेर मतमोजणीत अवघ्या सहा मतांनी सुभाष बने विजयी झाले. ते नवखे असून ही त्यांना माने यांनी सभापती पदावर विराजमान केले.

टाइम्स स्पेशल

त्यांनी नवखे असुन ही तालुक्याचा कारभार करताना बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला ८०% समाजकारणचा वसा जोपासत स्वच्छ व लोकाभिमुख काम करत सामान्य जनतेला न्याय मिळवून देत संघटनेची ताकद ही वाढवत आपला वेगळा ठसा उमटविला. १९९७ निवडणुकीत सुभाष बने व राजू महाडीक हे जिल्हा परिषद वर निवडून आले. या व नंतरच्या काळात सुभाष बने व रश्मी कदम, राजू महाडीक यांचेसह बने व महाडीक यांच्या घरच्यांनी ही जि.प. अध्यक्ष पद ही उपभोगली होती. त्यानंतर तालुक्यातील राजकारण अनेक स्थित्यंतरे आली. त्यात गुरू व शिष्य वेगवेगळ्या दिशांना गेले. तरी तालुक्यातील जनता मात्र कायम शिवसेनेच्यापाठी ठाम असल्याने पंचायत समितीवर भगवा कायम राहीला होता. दरम्यानचे काळात तालुक्यात सेना रुजवली ते माजी मंत्री रवींद्र माने पुन्हा स्वगृही परतलेवर शिवसेनेची बाजू भक्कम झाली असतानाच शिवसेनेतच उभी फुट पडत दोन गटात विभागाली गेली. गुरु अखेर श्रेष्ठ ठरल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg