loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात चोरटयांनी चोरलेले ३० मोबाईल केले जप्त - एकाला अटक, ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ ची कारवाई

ठाणे : (प्रतिनिधी) - ठाण्यात कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेताना ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने खबऱ्याच्या नेटवर्कद्वारा मिळवलेल्या माहितीवरून संशयावर अकबर शौकत अली शाह(२८) याला अटक करून त्याच्या राहत्या घरातून तब्बल ५ लाख २९ हजार रुपये किमतीचे ३० महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे गुन्हे शाखेने खबऱ्याच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीवरून अटक आरोपी अकबर शौकत अली शाह(२८) रा. चिंचोटी फाटा जवळील चाळ, नायगाव पूर्व, जि. पालघर हा मुळचा रा. गाव-भरोटिया बाजार, ठाणा-डुमरीगंज, जिल्हा-सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यास नायगाव पुर्व चिंचोटी गाव, तलावाचे जवळील चाळीमधील एका खोलीमधून, अटक करण्यात आली. त्याच्या राहत्या घराची तपासणी पोलीस पथकाने केल्यानंतर घरामध्ये विविध कंपनीचे विवो, सॅमसंग, रिअलमी, रेडमी, ओपो अशा वेगवेगळया कंपनीचे ५ लाख २९ हजार १०१ रूपये किंमतीचे एकुण ३० मोबाईल जप्त करण्यात आले. यात गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने कासारवडवली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची उकल करून आरोपीला गजाआड करण्याची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

टाइम्स स्पेशल

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहा. पोलीस आयुक्त (शोध १ गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -५ वागळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सपोनि जगदिश गावीत, पो. ना. उत्तम शेळके, रघुनाथ गार्डे, तेजस ठाणेकर, पोको निलेश शेडगे या पथकाने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg