loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस

लांजा (संजय साळवी) - काल सायंकाळी वादळी वार्‍यासह अचानकपणे कोसळलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पूर्व विभागातील आरगाव या गावाला अक्षरशः झोडपून काढले. अचानक वातावरणात बदल झाला आणि आकाशात पावसाचे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वार्‍यासह पाऊस कोसळायला सुरुवात झाली. वादळी वार्‍यासह कोसळलेल्या या पावसामुळे आरगाव येथील शेतकर्‍यांच्या घरांवरील कौले, पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकर्‍यांच्या केळीची झाडे वादळी वार्‍यामुळे उध्वस्त झाली. या तुफानी पावसाचा फटका आरगावमधील आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसला आहे. गावातील अनेक आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी बागायतदार यांचे पावसामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक तासभर हा पाऊस कोसळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg