loader
Breaking News
Breaking News
Foto

एलईडी मासेमारी, सा.नाटेतील नौकेवर धडक कारवाई

देवगड (वार्ताहर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या सागरी हद्दीत रत्नागिरीतील एलईडी मासेमारी करणार्‍या नौकेवर कारवाई करण्यात आली असून सदर बोटीवरील साहित्यासह ती जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देवगड परवाना अधिकार्‍यांनी पत्रकारांना दिली. विजयदुर्ग जवळच्या समुद्रात ही मासेमारी सुरु होती. देवगडच्या परवाना अधिकार्‍यांनी या हंगामातील एलईडी मासेमारीविरोधातील ही पहिलीच मोठी कारवाई असून, ती महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत करण्यात आली आहे. देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार गस्ती पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली. सागरी हद्दीत अंदाजे १८ ते २० वावा खोलीत साधारण १० सागरी मैल अंतरावर ही नौका दुसर्‍या पर्ससीन मासेमारी नौकेस एलईडी लाइट देऊन मासेमारीसाठी सहाय्य करत असल्याचे गस्ती दरम्यान आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गस्ती पथकाची नौका जवळ येताच संशयित नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, सतर्क पथकाने काही मिनिटांतच पाठलाग करून तिला ताब्यात घेतले. एलईडी मासेमारी नौकांकडून होणारी अनधिकृत मासेमारी स्थानिक मच्छीमारांच्या हितांना धक्का पोहोचवते आणि सागरी जैवविविधतेला मोठे नुकसान करते, असे किरण वाघमारे यांनी कारवाईनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले. किरण वाघमारे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की रत्नागिरीतील ही नौका असून तिचे नाव अल आदम असे आहे. राजापूरातील साखरीनाटे येथील आबिदीन जमालोद्दीन फणसोपकार यांच्या मालकीची ही नौका आहे. नौकेवर तांडेल आणि दोन खलाशी उपस्थित होते. त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून नौका देवगड बंदरात आणण्यात आली आहे. नौकेवर सापडलेले एलईडी साहित्य आणि जनरेटर पंचनामा करून जप्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, सुनावणीनंतर नौकामालक आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे. या कारवाईत किरण वाघमारे यांना सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि रक्षक ठुकरुल, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर आणि नेसवंणकर यांचे सहकार्य लाभले. कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पूर्णत्वास गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg