loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरिवलीत गुलाल उधळला! आडिवाडी गावात परंपरेचा मान; पेटली पहिली होळी

दापोली (​सागर गोवळे) - कोकणात सध्या होळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, बोरिवलीतील ऐतिहासिक आणि संस्कृतीचा वारसा ज जपणाऱ्या आडिवाडी गावात आज परंपरेचा जल्लोष पाहायला मिळाला. गावकऱ्यांच्या अथांग श्रद्धेचे प्रतीक असलेल्या आडिवाडीतील मुख्य मंदिरासमोर, परंपरेनुसार पहिली होळी आज सायंकाळी ५:३० वाजता मोठ्या थाटामाटात प्रज्वलित करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळी पाच वाजेपासूनच मंदिरात आणि होळीपाशी धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. पहिली होळी नियमाप्रमाणे गावातील इतर होळ्या पेटवण्यापूर्वी मंदिरातील या मुख्य होळीला अग्नी दिला जातो. सायंकाळी ५:३० च्या सुमारास 'होळी रे होळी, पुरणाची पोळी'च्या जयघोषात अग्नी प्रज्वलित करण्यात आला. ​यावेळी पारंपारिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा नाद आणि गावकऱ्यांच्या गाण्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरातील पहिली होळी पेटल्यामुळे, बोरिवलीच्या कानाकोपऱ्यात होळीच्या सणाचा अधिकृत श्रीगणेशा झाला असून हा उत्साह असाच कायम राहणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg