loader
Breaking News
Breaking News
Foto

उदयोजक रोहन विचारे मानाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

खेड - खेड शहर मराठा समाज आयोजित भव्य अश्या सांस्कृतिक कार्यक्रमात कै लीलाबाई गंगाराम कदम रंग मंचावर खेड मराठा भवन येथे जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, खेड नगरपालिका नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला, मराठा समाज अध्यक्ष शरद शिर्के, उपनगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू शेठ चिकणे, कार्यक्रम प्रमुख बुवा शिंदे, नगरसेवक सुनील दरेकर व विविध मान्यवरांच्या हस्ते उद्योजक रोहन विचारे यांना समाज भूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी खेड शहर मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठा बाणा’ या कार्यक्रमाला मराठा भवन, खेड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि परंपरेचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी आपल्या सौभाग्यवती अनिता अरुण कदम यांच्यासह उपस्थिती लावली. यांच्या आगमनावेळी खेड शहर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमात मराठा समाजाच्या इतिहास, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा जागर करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समाज एकत्र येऊन सामाजिक ऐक्य व प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘मराठा बाणा’ या कार्यक्रमामुळे समाजातील ऐक्य अधिक दृढ होऊन युवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाल्याची भावना जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg